शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्यामुळे नवीन पनवेल मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात...
रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात...

पनवेल दि.१९(संजय कदम): नवीन पनवेल सेक्टर ५ मधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख यतिन देशमुख यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली होती.  त्यानुसार या रस्त्यावरील खड्डे भारण्यासार सुरुवात झाली आहे. 
       शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करून नागरिकांच्या सम्स्म्य सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करत करते. त्यानुसार नवीन पनवेल सेक्टर ५ मधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवर पडलेल्या खाद्यनामुळे हैराण झाले होते. या समस्येबाबत नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख यतीन देशमुख यांच्या चर्चा केली. त्यांनतर त्यांनी तात्काळ पनवेल महापालिकेचे अधिकारी संजय जगताप यांच्याशी चर्चा करून समस्येवर तातडीने मार्ग काढण्यास सांगितले. नागरिकांना  भेडसावणाऱ्या या समस्येची दाखल घेऊन  खड्डे भरण्यास सुरूवात झाली आहे. या कामावेळी विभाग संघटक संतोष वाघमारे, राजेश वैंगणकर उपस्थित होते. 
फोटो: खड्डे
Comments