भाजप प्रदेश महासचिव तथा पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा....
वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा....
पनवेल दि.११ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजूंना धान्यवाटप, जेष्ठ नागरिकांना आधार छडीचे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप, आदिवासी वस्तीगृहाला डस्टबिन व आवश्यक वस्तूंचे वाटप, गतिमंद मुलांच्या आश्रमाला डस्टबिन व इतर स्वच्छता साहित्याचे वाटप, अनेक मंदिरांना डस्टबिन वाटप, रुग्णांना फळांचे वाटप, अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम तसेच युवांसाठी फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच प्रमाणे अनेक मान्यवरांनी त्यांच्या पनवेल येथील जनसेवा कार्यालयात भेट देऊन त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेछया दिल्या. तर अनेकांनी त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे नोटबुक शुभेच्छा म्हणून भेट दिली. दरम्यान वाढदिवसानिमित्त त्यांनी पनवेल शहर परिसरातील शिव मंदिर आणि बल्लाळेश्वर मंदिरात त्यांनी दर्शन घेतले आणि अभिषेक केला.
विकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त नेहमीच सामाजिक उपक्रम साकारला जात असतात  त्याचप्रमाणे यावर्षीही अनेक उपक्रम साकारण्यात आले. पनवेल मध्ये नेहमीच काहीतरी अभिनव संकल्पना करणारे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे, अनेक नावीन्यपूर्ण योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ते नेहमीच जनतेमध्ये चर्चेत राहिलेले आहेत. नागरिकांशी नाळ जोडलेले युवा म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण झालेली आहे. यांच्या या वाढदिवसानिमित्त अनेक हितचिंतकांनी सुद्धा विविध सामाजिक उपक्रम साकारण्याचे ठरवले आहे.  भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण राज्याचे महासचिव असल्याने केवळ पनवेलमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे हितचिंतक व कार्यकर्ते अनेक सामाजिक उपक्रम साकारण्यात आहेत. प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला येणाऱ्या हितचिंतकाची संख्या फार मोठी असते व सोबत येताना ते पुष्पगुच्छ घेऊन येत असल्याने हजारो पुष्पगुच्छ जमा होतात. या पुष्पगुच्छतील फुले दुसऱ्या दिवशी कोमेजून जात असल्याने ते पुष्पगुच्छ टाकून द्यावे लागतात तेव्हा मनाला फार वेदना होतात अशी भावना विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली. आणि म्हणून हितचिंतकांचे प्रेम असे वाया जाऊ नये याकरिता सोबत येताना शुभेच्छा घेऊन याव्या कोणतीही भेट वस्तू आणू नये व काही आणायचेच झाले तर "बुके नाही नोटबुक" असा संदेश त्यांनी दिला होता. त्यानुसार अनेकांनी नोट बुक भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
फोटो: विक्रांत पाटील वाढदिवस कार्यक्रम
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image