वपोनि अधिकराव पोळ यांची मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्तपदी तर सुभाष कोकाटे यांची खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पदोन्नती.....
 पोलीस अधिकारीपदी पदोन्नती.....

पनवेल दि. २३ (संजय कदम) : महाराष्ट्र दहशदवादविरोधी पथक, नवी मुंबई (एटीएस) येथे कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव महादेव पोळ यांची मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी तसेच खान्देश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दत्तात्रय कोकाटे यांची खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे.
                  महाराष्ट्र शासनाने राज्यातील १४३ पोलीस निरीक्षकांची पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र ) या संवर्गातील पदावर पदोन्नती जाहीर केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने आणि पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीने पोलीस अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेने तात्पुरती पदोन्नती देण्यात येत असल्याचे गृह विभागाने आदेश काढले आहेत. यात पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत मान्यता देण्यात येत असल्याचेही राज्याच्या गृह विभागाने आदेश काढले आहेत. यामध्ये महाराष्ट्र दहशदवादीविरोधी पथक, नवी मुंबई (एटीएस) येथे कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव महादेव पोळ यांची मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी तसेच खान्देश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दत्तात्रय कोकाटे यांची खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शिवदास शुक्ला यांची मुंबई सहायक पोलीस आयुक्तपदी, पनवेल महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उप अधीक्षक संदीप वसंत भागडीकर यांची सुद्धा मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई  कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक पोलीस उप अधीक्षक शिवाजी ज्ञानदेव फडतरे यांची पेण विभागीय पोलीस अधिकारीपदी, प्रदीप गिरीजनाथ तिदार यांची नवी मुंबई डायल ११२ पोलीस उप अधीक्षकपदी पदोन्नती करून बदली जाहीर झाली आहे. पदोन्न्ती झालेल्या अधिकाऱ्यांचे सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.    
फोटो : वपोनि अधिकराव पोळ व सुभाष कोकाटे
Comments
Popular posts
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image