बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रक मधून खाली पडून मृत्यू.....
बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रक मधून खाली पडून मृत्यू.....


पनवेल / दि.०४ (संजय कदम) : हयगयीने, बेदकार व निष्काळजी पणे चालवून ट्रक मधून स्वतःच्या चूकीने खाली पडून ट्रकचालक गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील नितळस गाव परिसरातील वावंजे ते मलंगगड रोडवर घडली आहे. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
           ट्रकचालक सोनू भारत लाल (वय २६, रा.उत्तरप्रदेश) हयाने त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच ४३ बीपी १९६४) नितलस गावाजवळ वावंजे ते मलंगगड रोडवर हयगयीने, बेदकार व निष्काळजी पणे चालवून जात असताना ट्रक मधून स्वतःच्या चूकीने खाली पडून त्यात तो गंभीर जखमी होऊन यात मृत्यू झाला. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ), २७९ सह मोटार वाहन अधिनियम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे करीत आहेत.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image