श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त ‘स्तनांच्या आजारांची तपासणी’; दोन सामुदायिक विवाह संपन्न ....
     दोन सामुदायिक विवाह संपन्न ....


पनवेल दि.२० (संजय कदम) : सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त पनवेलच्या साईबाबा मंदिर येथे श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल एकेटी(AKT) फाउंडेशन च्या माध्यमातून पहिल्यांदाच स्तनांच्या आजारांची तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अनेक महिलांनी घेतला. तसेच यावेळी दोन सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील श्री नारायण बाबा आश्रम येथील श्री साई बाबा मंदिरात पूज्य सदगुरु श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त आज श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल एकेटी(AKT) फाउंडेशन च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच स्तनांच्या आजारांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास ४० ते ५० महिलांची  या शिबिराचा लाभ घेतला.  दरम्यान सकाळी दोन सामुदायिक विवाह सोहळे संपन्न झाले आत्ता पर्यंत ८५ विवाह सोहळे ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, १४० हुन अधिक विधवा महिलांना राशन आणि १०८ हुहन अधिक मुलांना गृहपयोगी वस्तू देण्यात येणार असल्याची माहिती डॉ शाकुंतला भटिजा यांनी यावेळी दिली. यावेळी डॉ. अरविंद टकले उपस्थित होते.
फोटो : श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image