बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक....
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक....


पनवेल दि.२९ (वार्ताहर) : पनवेलच्या तालुक्यातील कोन गाव परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. या कारवाईत एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. 
              पनवेलच्या कोन भागातील अवधूत बिल्डिंगमध्ये काही बांग्लादेशी राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांनी त्यांना पकडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक नीलम पवार आणि त्यांच्या पथकाने शाबीर बाबू मुल्ला (१९), तुनतुनी खानम मंडल (३४) आणि सोनाली अजुमूल शेख (२९) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. हे नागरिक बांधकाम साईटवर मजुरी आणि घरकाम करून सहा महिन्यांपासून या ठिकाणी राहत असल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार या सर्वांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image