परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा ....
पनवेल (प्रतिनिधी) माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा वॉरियर्स कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्ताने जपान विरुद्ध पनवेल असा प्रेक्षणीय सामना रसिकांना अनुभवयास मिळाला.
समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत कामोठ्यात युवा वॉरियर्स कबड्डी लीग या विद्युत प्रकाशझोतातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते बुधवारी झाले. तसेच या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या तसेच माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या प्रारंभी जपान विरुद्ध पनवेल या प्रेक्षणीय सामन्याने स्पर्धेत रंगत आणली.
कामोठे सेक्टर ६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्रांगणात युवा वॉरियर्स कबड्डी लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जेष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका कुसुमताई म्हात्रे, ओबीसी उत्तर रायगड अध्यक्ष राजेश गायकर, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे युवा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, दामोदर चव्हाण, तेजस जाधव, आदित्य भगत, अरुण भगत, नितेश पाटील, भाजप युवा नेते हॅप्पी सिंग, युवा नेते महेंद्र भोपी, भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा विद्या तामखेडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष नाना मगदूम, भाजप सरचिटणीस सुशील शर्मा, भाजप लीगल सेलचे अॅडव्होकेट जय पावणेकर, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कामोठे येथे सुरु असलेल्या या तालुकास्तरीय कबड्डी लीग स्पर्धा पुरुष गटात होत असून विजेत्या संघास २१ हजार १११ रुपये, उपविजेत्यास १५ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकास ११ हजार १११ रुपये आणि तिन्ही विजेत्या संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.