पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सह महाविकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध...
महाविकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध...

पनवेल / दि.१० (संजय कदम) : पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सह महाविकास आघाडीने विजयी सलामी दिली असून या निवडणुकीत आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 
                        
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे १, काँग्रेसचे १ व शेकापचे ५ असे ७ सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये देवेंद्र पाटील, सुभाष पाटील, सुनील सोनवणे, प्रताप हातमोडे, रामचंद्र पाटील, सखाराम पाटील व ललिता गोपीनाथ फडके हे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रताप चंद्रकांत हातमोडे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांनी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शनपर आशिर्वाद घेतले. यावेळी पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गिरवले ग्रामपंचायत महेंद्र गायकर आदी उपस्थित होते. 
फोटो : बबनदादा पाटील यांचे नवनिर्वाचीत सदस्य प्रताप हातमोडे यांनी घेतले आशिर्वाद
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image