ओरियन मॉलच्या वर्धापन दिनानिमित्त नशीबवान विजेत्यास मिळणार सिंगापूर टूरची संधी....
 सिंगापूर टूरची संधी.... 

पनवेल दि.२७ (संजय कदम) : पनवेलमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची पहिली पसंती असलेले ओरियन मॉलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त नशीबवान विजेत्यास सिंगापूर टूर तसेच ओला एस वन इलेक्ट्रिक बाइकची संधी मिळणार आहे. याचा लकी ड्रॉ हास्यजत्रा फेम अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते रविवार ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता ओरियन मॉलमध्ये काढण्यात येणार आहे.
पनवेल मधील ग्राहकांची पहिली पसंती असलेले ओरियन मॉलच्या माध्यमातून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना गिफ्ट व्हाउचर आणि इतर भेटवस्तूची जोड मिळत असते. यावर्षी ओरियन मॉल आपला सातवा वर्धापन दिन साजरा करत आहे. आणि या सातव्या वर्धापन दिना निमित्त मॉलच्या वतीने खरेदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा लकी ड्रॉ हास्यजत्रा फेम अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते रविवार ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता ओरियन मॉलमध्ये काढण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या विजेताला सिंगापूर टूरची सुवर्णसंधी मिळणार आहे तर दुसऱ्या विजेत्याला ओला एस वन इलेक्ट्रिक बाइक मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी या संधीचा फायदा घेऊन मॉलमध्ये भरपूर शॉपिंग करा आणि या स्पर्धेत सहभागी व्हा असे आवाहन ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. 
फोटो : अभिनेत्री श्रेया बुगडे आवाहन
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image