आगामी सणांनिमित्त पनवेल शहर पोलिसांची ट्रस्टी व मौलवींसोबत बैठक...
आगामी सणांनिमित्त पनवेल शहर पोलिसांची ट्रस्टी व मौलवींसोबत बैठक... 

पनवेल दि.१९ (संजय कदम) : आगामी येणारे सण पनवेल शहरात शांतता व सलोखा राखत मोठ्या उत्साहाने साजरी करा अशी सूचना व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी केले. अक्षय तृतीया आणि रमजान ईदनिमित्त पनवेल शहर पोलीस ठाण्यात मोहल्ला कमिटी, मज्जिद ट्रस्टी व मौलवी यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. 
                यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्यासह गोपनीय व पासपोर्ट विभागाचे सहाय्यक फौजदार संजय धारेराव, पोलीस हवालदार गौतम भोईर, पोलीस नाईक भाऊसाहेब लोंढे, पोलीस नाईक किरण सोनावणे, स्थानिक मा नगरसेवक मुकीद काझी यांच्यासह मोहल्ला कमिटी, मज्जिद ट्रस्टी व मौलवी उपस्थित होते. यावेळी दिलीप शिंदे यांनी मार्गदर्शन करताना आक्षेपार्ह पोस्टर्स/ बॅनर लावू नये, धार्मिक तेढ निर्माण होईल असे भाषण करू  नये, मशिद जवळ वाहन पार्क करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर/ व्हाट्सअपवर काही आक्षेपार्ह विधानबाबत माहीती मिळाल्यास पोलिसांना माहिती द्यावी, न्यायालयीन आदेशानुसार स्पीकरचा वापर करावा, आक्षेपार्ह वस्तू, वाहने, इसम, इत्यादी आढळून आल्यास पोलीस ठाण्याची संपर्क साधावा अश्या सूचना दिल्या. तसेच रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
फोटो : प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे मार्गदर्शन करताना
Comments