होलार समाजातील समाजसेवकांचा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पक्ष प्रवेश...
होलार समाजातील समाजसेवकांचा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पक्ष प्रवेश...


पनवेल / दि.१५ (संजय कदम): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व होलार समाज भूषण वि.दा. ऐवळे साहेब संयुक्त मोठ्या उत्साहात साजरी झाली. या जयंतीचे औचित्यसाधून होलार समाजातील शेकडो जणांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व होलार समाज भूषण वि.दा. ऐवळे यांचे संयुक्त जयंती चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समाज भूषण वि. दा. ऐवळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांची अभिवादन अभिवादन केले. या ऐतिहासिक दिनानिमित्त तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड-पनवेल शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांच्या प्रयत्नाने होलार समाजातील समाजसेवक संभाजी जावीर, मयुर गोळे, विजय हातेकर, संजय जवीर, नवनाथ हेगडे, पांडुरंग केगार, बापूसाहेब कांबळे, हेमलता जावीर, यांच्यासह शेकडो समाज बांधवांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. 

यावेळी पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर संघटक डी. एन. मिश्रा, शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.



फोटो: पक्ष प्रवेश
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image