विजय गोंधळी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.....
विजय गोंधळी यांचे अल्पशा आजाराने निधन.....
 
पनवेल / दि २७ प्रतिनिधी  : -. 
तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते  विजय मंगल गोंधळी( वय वर्ष ५६  ) यांचे रविवार  दि २६ /०२ /२०२३  रोजी अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले आहे. 
रिलायन्स ,बॉम्बे डायिंग अशा विविध कंपनी मध्ये त्यांनी काम केले आहे .एक कुशल कर्मचारी म्हणून त्यांची  रसायनी भागात ओळख होती.   सगळ्यांना अडीअडचणीत मदत करणारे सर्वांच्या सुख दुखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते. 
त्यांच्या पश्च्यात  मूलगी, नातवंडे, भाऊ ,जावई,बहिणी असा त्यांचा कुटुंब परिवार आहे.कै. विजय मंगल गोंधळी  यांच्या अल्पशा निधनामुळे गोंधळी  कुटुंब व खांदा गाव ,रिस, खोपोली  येथील ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.

कै विजय मंगल गोंधळी  यांचे  दशक्रिया विधी श्री क्षेत्र गूळसुंदे येथे मंगळवार दिनांक 07/03/2023 रोजी होणार आहे उत्तर कार्यविधी शुक्रवार  दि 10/3/2023 रोजी गोंधळी निवास गणेश नगर, अपूर्वा हॉटेल जवळ रिस  येथे होणार आहे.मामा व्यतिरिक्त  कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्विकारले जाणार नाही असे त्यांच्या कुटुंबियांमार्फत कळविण्यात आले आहे.
Comments