रायगड जिल्हा भाजप सरचिटणीसपदी नितीन पाटील यांची नियुक्ती ; नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा...
नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा... 

पनवेल /(प्रतिनिधी) :- उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि डँशिंग व्यक्तिमत्व असलेले नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
         सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रात नितीन पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. नगरसेवक व पनवेल शहर भाजपचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नितीन पाटील यांचे आज(दि. १८) पनवेल येथे भाजपच्या तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, दक्षिण रायगड युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग, शहर सरचिटणीस अमरिश मोकल आदी उपस्थित होते. 

-कोट 
नितीन पाटील हे अभ्यासू आणि सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवतानाच शहर सरचिटणीस म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केले आहे. त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस म्हणून आता जबाबदारी वाढली आहे आणि त्या अनुषंगाने ते आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील. 

आमदार प्रशांत ठाकूर, 
अध्यक्ष-रायगड जिल्हा भाजप
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image