करंजाडे गावचे सरपंच मंगेश शेलार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा....
पनवेल / (प्रतिनिधी ) : - भारतीय जनता पार्टीचे सरपंच करंजाडे गावचे मंगेश दादा शेलार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या औचित्य साधून करंजाडे रहिवाशांना आरोग्य तपासणी , रक्तदान शिबिर, स्वच्छालयाची बांधणी, पिण्याचे पाण्याची टाकीचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. करंजाडे नागरिकांनी आपले मत यावेळी मांडले करंजाडे गावाला चांगले सरपंच मिळाले असेच काम मंगेश दादा शेलार यांनी करून दाखवले नागरिकांनी सांगितले करंजाडे वासी यांना पाण्याचा प्रश्न पडला असतानी करंजाडे गावचे सरपंच मंगेश शेलार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने भूमिपूजन केले यावेळी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे उपसरपंच सागर आंग्रे ग्रामसेवक प्रेमसिंग गिरसे कर्नल शेलार सुनील भोईर नाथाभाई भरवड आतिश साबळे नंदू भोईर निनाद मुंबईकर अधिक मान्यवर उपस्थित होते