शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे यांचा विशेष सत्कार...
मा.नगरसेवक विश्वास म्हात्रे यांचा सत्कार...
पनवेल वैभव/  दि. २१ ( संजय कदम ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे यांचा आज बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिनानिमित्त पनवेल शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत विशेष सत्कार करण्यात आला . 
                 जेष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक विश्वास म्हात्रे यांना नॅशनल लेवल चित्रकला स्पर्धेत ५१ वर्षीय गटात सिल्वर मेडल मिळाले. त्याकरिता शिवसेना शाखा पनवेल तर्फे विशेष सत्कार शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला . 
यावेळी अच्युत मनोरे, सुजन मुसलोडकर , सनी टेमघरे, प्रदीप माखीचा, भरत कल्याणकर, राजेश शेट्टीगार , सुनंदा पाटील, अर्चना कुळकर्णी, उज्वला गावडे, साईसूरज पवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. 
फोटो - मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे यांचा विशेष सत्कार
Comments