कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालकांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन...
रिक्षा चालकांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन...

पनवेल /प्रतिनिधी
खांदेश्वर स्टेशन येथील रेझिंग डे च्या निमित्ताने स्थानिक प्रकल्पग्रस्त खांदेश्वर रिक्षा चालक मालक यांना नवी मुंबई कळंबोली वाहतूक शाखेचे  वरिष्ठ अधिकारी निशिकांत विश्वकार  साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालकांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन केले.
 भाडे नाकारणे, गणवेश परिधान करणे, मोबाईलवर न बोलणे, रिक्षा स्टॅन्ड जवळ बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणे, नागरिकांची सौजन्याने वागणे, ॲम्बुलन्स ला रस्ता मोकळा करून देणे, तंबाखू व मद्यपान पासून दूर राहणे.
 या सर्व सूचना नवी मुंबई  कळंबोली वाहतूक शाखेचे पी एस आय साळुंखे पी एस आय साठे साहेब यांनी रिक्षाचालकांना दिल्या. तसेच या सर्व सूचनांचा पालन आम्ही रिक्षा चालक काळजीपूर्वक करू असे आश्वासन स्थानिक रिक्षा चालकांनी पीएसआय साळुंखे यांना दिले.
 तसेच तिथे उपस्थित स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष. मच्छिंद्र पाटील, रिक्षाचालक. भरत कावले, हनुमान भगत, दीपक पाटील, रवींद्र पाटील, सुरेश पाटील, राम भगत, विलीन धूंद्रेकर,मिलिंद भगत, प्रवीण तेरडे, संदीप तांबडे, श्रीकांत कावळे, अशोक म्हात्रे, सचिन पाटील, कृष्णा तांबडे, मनोहर म्हात्रे, हरीश म्हात्रे, दिनेश भगत, भगवान पाटील, गौरव भगत,योगेश तांबडे, अनिल पाटील, बाबुराव पाटील, संजय हुद्दार, संतोष पाटील. चंद्रकांत भगत, भाई पाटील, बाबुराव नाईक, रोशन पाटील, रुपेश पाटील, शिवाजी म्हात्रे, ज्ञानेश्वर भगत. हे सर्व रिक्षा चालक उपस्थित होते.
Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल शहर शाखेत मानवंदना..
Image