अज्ञात माथेफिरू कडून वाहनांची जाळपोळ ;एक ट्रॅक्टर,चार दुचाकीसह एका रिक्षाला लावली आग...
एका रिक्षाला लावली आग...

पनवेल / दि.०७ (संजय कदम) : पनवेल परिसरात चार वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात माथेफिरू कडून वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली असून यामध्ये या माथेफिरूने एक ट्रॅक्टर, तीन दुचाकीसह एका रिक्षाला आग लावली आहे. 

पनवेल शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्स येथील सप्तगिरी बार समोर उभी ठेवलेली एक मोटारसायकल, पटेल हॉस्पिटल शेजारी अनिल झेरॉक्स येथे पार्क करून ठेवलेल्या तीन मोटारसायकली तसेच जवळच जोशी आळी परिसरात उभी करून ठेवलेली एक रिक्षा त्याचप्रमाणे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील पार्किंग मध्ये उभा करून ठेवलेला एक ट्रॅक्टर अश्या चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करून ठेवलेली पाच वाहने अज्ञात इसमाने जाळल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके ठीक-ठिकाणी रवाना झाली असून सीसीटीव्हीच्या सदर आरोपीचा शोध घेत असून लवकरच आरोपीला गजाआड करू असा विश्वास विजय कादबाने यांनी व्यक्त केला आहे. फोटो : जाळलेली वाहने
Comments