कळंबोलीतील शीख बांधवांचा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पक्ष प्रवेश...
कळंबोलीतील शीख बांधवांचा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पक्ष प्रवेश...
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे  व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना शहर प्रमुख सुर्यकांत म्हसकर यांच्या विशेष प्रयत्नाने कळंबोली येथील शेकडो शीख बांधवांनी आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

तसेच यावेळी नरेंद्रसिंग होटी यांची उपशहर प्रमुख कळंबोली पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सर्व शीख बांधवांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. 

याप्रसंगी शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगर संघटक आत्माराम गावंड, शहर प्रमुख खारघर गुरुनाथ पाटील, कळंबोली शहर समन्वयक गिरीश धुमाळ, शहर संघटक अक्षय साळुंखे, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, विभाग समन्वयक संजय कानडे, महिला आघाडीच्या कळंबोली शहर संघटीका ज्योती मोहिते, शहर संपर्क संघटीका रत्नमाला शिंदे, उपशाखा प्रमुख कैलास कांदळकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image