पेटत्या गाडीतून वेळीच बाहेर पडल्याने प्रवाशांचे जीव बचावले....
पेटत्या गाडीतून वेळीच बाहेर पडल्याने प्रवाशांचे जीव बचावले...

पनवेल वैभव / दि.3 (संजय कदम) ः अचानकपणे गाडीला आग लागल्याचे पाहून गाडीतील प्रवाशी पटकन बाहेर पडल्याने व त्याच वेळी गाडीने पूर्णपणे पेट घेतल्याने गाडीतील प्रवाशांचे जीव बचावल्याची घटना पनवेल जवळील मुंबई-पुणे लेनवर कि.मी.13/600 च्या हद्दीत घडला आहे. या दुर्घटनेत प्रवाशी जखमी झाले नाहीत.
क्रूज कार  क्र.एमएच 43 एजे 3192 वरील चालक हर्ष ईश्‍वरी प्रसाद कश्यप वय 20 हे आपल्या ताब्यातील कार व त्यात दोन महिला तीन पुरुष असे मित्रमंडळीसह मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे ने  चालवीत घेऊन जात असताना त्यांची ताब्यातील कारचे पुढील बोनट मधून धुर व आग येत असल्याचे जाणवल्याने त्यांनी कार ताबडतोब रोडच्या साईडला रेलिंग जवळ थांबवून कार मधील मित्र मंडळीसह सह खाली उतरले असता काही वेळातच कार ने पेट घेतल्याने  सदर ठिकाणांहून आय आर बी  पेट्रोलिंग वाहन जात असताना त्यांनी ताबडतोब देवदूत फायर ब्रिगेड चे साह्याने सदर जळीत कारची आग  विझवली. व कार मधील प्रवासी यांना दुसर्‍या खाजगी कार ने सुरक्षित ठिकाणी रवाना करुन आगीत पेटलेली अपघातग्रस्त वाहन आय आर बी क्रेनच्या साह्याने रोडच्या शोल्डर लाईनला पलीकडे ठेवून, महामार्गावरील वाहतूक सुरळीत केलेले आहे . सदर अपघाताच्या ठिकाणी आय आर बी स्टाफ , आय आर बी रुग्णवाहिका स्टाफ सह, फायर ब्रिगेड मोबाईल स्टाफ हजर होते.


फोटो ः आग लागलेले वाहन
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image