स्थानिक प्रकल्पग्रस्तांना फेरीवाला क्षेत्रामध्ये (हॉकर्स झोन) भूखंड देण्यात यावा -भरत पाटील
उपजिल्हा प्रमुख रायगड- अध्यक्ष  शिवशक्ती फेरीवाला संघ भरत पाटील 

पनवेल दि. ०९ ( वार्ताहर ) : खारघर या निम्नशहरी विभागात अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. खारघर परिसरात विविध क्षेत्रातील परप्रांतीय व्यवसायिक स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य न देता आपल्या गावातील, जिल्ह्यातील राज्यातील मजूर आणत असतात. म्हणून दैनंदिन व्यवसाय करणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना फेरीवाला क्षेत्रामध्ये (हॉकर्स झोन) भूखंड देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे ,उपजिल्हा प्रमुख रायगड -पनवेल व अध्यक्ष  शिवशक्ती फेरीवाला संघ भरत पाटील  यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे. 
                        
सिडकोने येथील भूमिहीन केलेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध व्हावा व वर्षानुवर्ष व्यवसाय करणाऱ्यांना वाशी, नेरुळ , ऐरोली, सीबीडी, कळंबोळी, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, तळोजा येथे फेरीवाला क्षेत्र निश्चित करुन गाळेवाटप केलेले आहेत. या विषयाला अनुसरून खारघर येथे अनेक वेळा व सातत्याने मागणी करुनसुध्दा अद्याप दैनंदिन व्यवसाय स्थानिक करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना फेरीवाला क्षेत्रामध्ये (हॉकर्स झोन) भूखंड मिळाले नाहीत. खारघरमध्ये फेरीवाले क्षेत्र जाहीर करण्यात यावे, अशी मागणी भरत पाटील यांनी आयुक्तांना लेखी निवेदनाने केली आहे.


फोटो -  भरत पाटील
Comments