विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई ...
विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई ..

पनवेल / दि २६, (वार्ताहर): पनवेल तालुका परिसरात अवैध्यरित्या विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. 
                तालुक्यातील बारापाडा परिसरात एका इसमावर कारवाई करून त्याच्याकडून पाच लिटर दारू चा साठा  हस्तगत करण्यात आला आहे. तसेच पेंधर परिसरातूनही अकरा हजार रुपये किमतीचा मद्य साठा हस्तगत करण्यात आला आहे. या धडक कारवायामुळे विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Comments