शिवसेना पनवेल लीगल सेलच्या मागणीची तहसीलदारांनी घेतली तात्काळ दखल...
शिवसेना पनवेल लीगल सेलच्या मागणीची तहसीलदारांनी घेतली तात्काळ दखल

पनवेल / प्रतिनिधी : - महसुली गावांमधील फेरफार नोंदींच्या बाबत कबुली जबाब संचिका तहसिलदार कार्यालयाच्या अभिलेख कक्षात जतन ठेवल्या जातात.
पनवेल तालुक्यातील महसुली गावांमधील कबुली संचिकेच्या सही-शिक्क्याच्या नकलेची मागणी केली असता तहसिलदार, पनवेल कार्यालयाकडून अनेक दिवस बऱ्याच फेऱ्या मारत राहिल्यावर बहुतांश वेळा कबुली जबाब संचिका आढळून येत नाही असे उत्तर मिळते.

सदर समस्या तडीस नेण्यासाठी शिवसेना लीगल सेल, पनवेल यांच्यातर्फे शिवसैनिक ॲड. सचिन म्हात्रे, ॲड. महेश देशमुख, ॲड. संगिता रोकडे, ॲड. सुयश कामेरकर, ॲड. महेश केणी, ॲड. सुशांत घरत, ॲड. विनोद पटेल, ॲड. रोहन मोरे आणि ॲड. अमर पटवर्धन यांनी निवेदन दिले असता विजय तळेकर तहसीलदार, पनवेल यांनी तात्काळ सदर विनंती मान्य करत अभिलेख कक्षाला योग्य ती उपाययोजना करण्याचे तोंडी आदेश दिले. याप्रसंगी तहसिलदार तळेकरांच्या कार्यतत्परतेबद्दल शिवसेना लीगल सेल तर्फे ॲड. अमर पटवर्धन यांनी त्यांचे आभार मानले.
Comments