भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन महिलांना पकडले..
भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन महिलांना पकडले


पनवेल दि.१२(वार्ताहर): खारघर गावात भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महिला आणि तिच्या मुलीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 
             
खारघर गावात भीक मागणाऱ्या महिलेने गावातील विश्वनाथ भगत यांच्या घरी आपल्या मुलीला चोरी करण्यासाठी पाठविले होते. मुलीने मोबाईल व इतर साहित्य चोरी करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला;  विश्वनाथ भगत यांच्या पत्नीला हा प्रकार समजल्याने मुलीला रंगेहाथ पकडले.
Comments