माजी नगरसेवक राजू सोनी यांनी अज्ञात वाहनानी धडक दिलेला पोल त्वरित बदलून जपली सामाजिक बांधिलकी..
 जपली सामाजिक बांधिलकी  
पनवेल / वार्ताहर : -  पनवेल येथील शिव शंभो नाक्याजवळील सिग्नलच्या पोलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे तो पोल अत्यंत धोकदायक झाला होता. व तो पोल कधीही  वाहनांवर पडून मोठे नुकसान झाले असते तसेच मोठी जीवित हानी देखील झाली असती. परंतु वेळीच त्याची दखल घेत त्या ठिकाणी सेवेवर कार्यरत असलेले ट्रॉफीक हावलदार म्हात्रे यांनी लगेच माजी नगरसेवक राजू सोनी यांना कळवले त्यांनी लगेच त्यांचे स्विय सहायक मंदार देसाई यांना जाण्यास सांगितले व त्यांना सहकार्य करण्यास सांगितले.त्यांनी तेथे जाऊन ताबडतोब अग्निशामक दलाचे प्रमुख अनिल जाधव यांना फोन करून अग्निशामक दलाला तेथे बोलवले. तसेच त्या ठिकाणी असलेले वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी गणेश खांडेकर साहेब व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार कदम व कोकाटे मॅडम यांच्या  मदतीने तेथे क्रेन बोलवून त्या वाकलेल्या पोलला  सरळ करून माजी नगरसेवक राजू सोनी साहेब यांच्या स्व खर्चाने व त्यांची स्वतःची माणसे लावून त्या पोलच्या बाजूस फाऊंडेशन टाकून पोल सुरक्षित करण्यात आला व सिग्नल यंत्रणा चालू करण्यात आली. त्यामुळे येथे असलेले वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नगरसेवक राजू सोनी व मंदार देसाई यांचे आभार मानले.
Comments