रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान...
पनवेल / वार्ताहर - : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या वतीने रविवार 28/08/22 रोजी प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियानाचे पनवेल महानगर पालिका माजी सभागृह नेता, रोटरीयन परेश ठाकुर यांच्या शुभहस्ते बालाजी आंगण को . ऑप. हौ . सो . पनवेल येथे उदघाटन झाले. सदर उपक्रम हा क्लबचे मार्गदर्शक PDG. ARRFC डॉ. गिरीश गुणे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली मोठया उत्साहात पार पाडला.
या उपक्रमात महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत पत्रके वाटून आणि भित्तीपत्रके प्रदर्शित करून जंनजागृती करण्यात आली. तसेच आपल्या घरा घरातून पर्यावरणाला हानिकारक आणि प्रतिबंधित प्लास्टिक सोसायटी प्रवेशद्वारावर जमा करावे असे आवाहन करण्यात आले . जमा झालेले प्लास्टिक हे रीसायकलिंग साठी "waste warriors -पनवेल " ही सामाजिक संस्था त्यांच्या माध्यमातून पुढे पाठविणार असे उपस्थित राहिवाश्यांना आश्वासन देण्यात आले .
या उपक्रमा मध्ये पनवेल मधील अरुणोदय सोसायटी , स्टॅन्ड व्ह्यू सोसायटी , मोराज - नॅशनल सीसायटी तक्का , बालाजी सिंफनी - सुकापूर , नील पार्क , वसंत अर्पित अशा मोठया सोसायटी मध्ये जनजागृती करून आणि प्रतिबंधित प्लास्टिक जमा केले आणि एका चांगल्या पर्यावरण पूरक उपक्रमाची सुरवात केली .
सदर उपक्रमात जवळपास 200 किलो ग्राम प्रतिबंधित प्लास्टिक जमा करण्यासाठी भारत गँस एजन्सी पनवेलने वाहनांची सोय केली.
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रलने हा उपक्रम महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रंण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. .
सदरच्या ह्या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष रो. लक्ष्मण पाटील , सेक्रेटरी रो . अनिल ठकेकर , प्रोजेक्ट डायरेक्टर रो .ऋषिकेश बुवा , रो. आमोद दिवेकर, रो. संतोष घोडिंदे, महानगरपालिका आरोग्य विभागाचे शैलेश गायकवाड, रो. भगवान पाटील , रो. प्रिया पाटील, रो. विक्रम कैया, रो. प्रीतम कैया, रो. सुदीप गायकवाड, रो. सायली सातवळेकर, रो.मनोज आंग्रे, रो. अमित पुजारी, रो. अनिल खांडेकर ,रो. रतन खरोल, रो. डॉ. संजीवनी गुणे, रो. दीपक गडगे, रो. सिकंदर पाटील, रो.शिरीष वारंगे, रो. श्वेता वारंगे आणि पनवेल महानगर पालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते .