ह.भ.प.विष्णूदादा यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन...


शिवसेना तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन..

पनवेल / प्रतिनिधी : -  शिवसेना पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन ह.भ.प.आप्पा माऊलीचे यांचे पुत्र वारकरी संप्रदायाचे सर्वांचे लाडके आदरणीय ह भ प. विष्णूदादा पनवेल यांच्या शुभ हस्ते आज  गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर झाले..

यावेळी तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, वळवली जेष्ठ शिवसैनिक मारुती पाटील, दिलिप पाटील,(मा.सरपंच) अशोक पाटील, दगडू पाटील,ह.भ.प बाळारामबुवा म्हात्रे, ह.भ.प गनुबुवा पालेकर, हा.भ.प.प्रल्हादबुवा पेटकर, ह.भ.प. कालुरामबुवा पाटील, हरींचंद्र पाटील, बळीराम पाटील, सुरेश पाटील नामदेव पाटील, संदेश पाटील, सुदाम पाटील उपस्थित होते,सोमदत्त मंडळाचे चालक मारुती पाटील या सर्वांचे स्वागत शिवसेना तालुका प्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर यांनी केले.
यावेळी वळवलीचे शिवसेना शाखाप्रमुख प्रविण पाटील, सचिन पाटिल(उपशाखा प्रमुख)प्रदीप पाटील (विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन,युवासेनेचे रोशन पाटील, विकास पेटकर, आकाश ,संदेश पाटील,आकाश पेटकर, आतिष पाटील आदी उपस्थित होते.
Comments