दारूच्या नशेत पडून इसमाचा मृत्यू ...
दारूच्या नशेत पडून इसमाचा मृत्यू ...

पनवेल दि . २१ ( संजय कदम ) : दारूच्या नशेत पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल शहरातील चिन्मय गौरंग गृहसंकुल सोसायटीच्या जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालय समोरील मोकळ्या जागेत घडली असून, सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत . 
              सदर इसमाचे अंदाजे वय ( ३५-४०) वर्ष ,रंग गोरा ,उंची पाच फूट सहा इंच , डोक्यावरील केस काळे , उजव्या हातात काळा धागा बांधलेला आहे चेहरा उभट , अंगात नेव्ही ब्लु रंगाचा हाफ टीशर्ट त्यावर सफेद रंगाच्या रेषा आहे, कंबरेला काळा धागा बांधलेला आहे तसेच तपकीरी रंगाची  बरमुडा पॅन्ट व आत मध्ये काळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे . या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर - ०२२-२७४५२३३३  किंवा पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांच्याशी संपर्क साधावा . 

फोटो - मयत इसम
Comments