कामोठे उड्डाण पुलावर विचित्र अपघातात; एक ठार सहा जखमी ...
कामोठे उड्डाण पुलावर  विचित्र अपघातात; एक ठार सहा जखमी 

पनवेल दि. १९ (वार्ताहर  ) :सायन पनवेल महामार्गावर कामोठे उड्डाणपुलावर मुबई च्या दिशेने जाणाऱ्या लेनवर आज सकाळी आठच्या सुमारास एक विचित्र अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच गाड्या एकमेकावर आदळल्या आणि या मध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा प्रवाशी जखमी झाले आहेत.
                   कामोठे उड्डाणपुलावर मुबई च्या दिशेने जाणाऱ्या लेनवर सकाळी ट्रक बंद पडला होता. हा ट्रक चालू करण्यासाठी  ट्रकचे काम चालू होते. याच वेळी  मागून भरधाव येणाऱ्या वॅगन आर गाडी, इनोवा, एक ट्रक आणि एसटी महामंडळाची शिवनेरी बस,एकमेकांवर धडकल्या त्यात व्हॅगनार मधील एक जणांचा मृत्यू झाला असून त्यातील इतर सहप्रवासी व इनोव्हा मधील प्रवासी असे जवळ पास सहा  जण जखमी झाले आहेत या जखमींवर  नजीकच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे


फोटो- अपघात गस्त वहाने
Comments