विशाल मनोहर सावंत मित्र परिवाराच्या वतीने वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप..
वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप ..         

पनवेल प्रतिनिधी: -. विशाल मनोहर सावंत मित्र परिवार यांच्या विद्यमाने सावरसई येथील विद्यार्थ्यांना वहया तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 
यावेळी बोलताना सावरसई  ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अॅड.योगेश दिवेकर यांनी सांगितले की, विशाल मनोहर सावंत मित्र परिवार यांच्या व माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवले जातात. गरीब व गरजू मुले शिक्षणापासून राबविण्यात वंचित राहू नयेत या उद्देशानेच हा वहया वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळातही संयुक्तरित्या धान्य वाटप अनेक ठिकाणी करण्यात आले. तसेच महाड पूरग्रस्त भागात जावून जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही विशाल मनोहर सावंत मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले.

आपत्तीमध्ये सापडलेल्या नागरिकांना तात्काळ कशी मदत मिळेल यासाठी विशाल मनोहर सावंत मित्र परिवार नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिक मनोहर सावंत, आनंद पाटील ,विशाल सावंत,अरूण घाडगे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रिया फाऊंडेशनचे संदीप म्हात्रे,किशोर विचारे, गणेश लोकरे, समीर मते,  निशान पाटील,निलेश लोकरे,रूपेश चव्हाण,सुरज मरले, प्रणय दळवी,  रितेश सावंत,जयेश मोरे,किरण पाटील, वैभव चिंबोरे,ओंकार जाधव, ज्ञानेश्वर पारधी,सुशांत पाटील,योगेश जठार आदींनी प्रयत्न केले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image