मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट
पनवेल / प्रतिनिधी : - शिवसेना रायगडचे नवनिर्वाचित जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी आज महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बबनदादा पाटील यांचे नियुक्तीबद्दल एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
याचसोबत नावडे येथील श्री सदस्य परिवारास बैठकीसाठी सिडकोच्या माध्यमातून आरक्षित भूखंड मिळावा यासाठी बबनदादा पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन दिले..
यावेळी पनवेल महानगर संघटक प्रथमेश सोमण, विभागप्रमुख गणेश म्हात्रे, तळोजे शहर संपर्कप्रमुख मुरलीधर म्हात्रे आदी उपस्थित होते.