पनवेल मधील रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत खा.बारणेंची आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी..
 खा.बारणेंची आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी..
पनवेल (अनिल कुरघोडे) : - पनवेल मधील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निदर्शनास स्थानिक नागरिकांनी व शिवसैनिकांनी आणल्याने खासदार बारणे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना ते रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ते करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे पत्र देण्यात आले आहे.

पटेल मोहल्ला येथील ईदगाह मुस्लीम कब्रस्थान येथील रस्ता खूपच खराब झाला असून पावसाळ्यात तो पूर्ण पणे चिखलात जातो, त्यामुळे अंत्यसंस्कार करणेस खूप त्रासदायक होते, त्याचप्रमाणे धाकटा खांदा गाव येथील तळ्याकाठचा रस्ता देखील पावसाळ्यात तलाव पूर्ण भरून वाहू लागतो त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास खूप अडचण होते परिणामी अपघात देखील होऊ शकतात त्यामुळे तलावाला सुरक्षा भिंत व रस्ता दुरुस्त होणे आवश्यक आहे. सदर रस्ते दुरुस्त करणे बाबत आयुक्त गणेश देशमुख यांना खासदर बारणे यांनी पत्र देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

सदरच्या रस्त्यांबाबत खासदारांना पत्र देताना पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, मा.नगरसेवक विश्वास म्हात्रे, गजफर नावडेकर, शाखाप्रमुख भास्कर पाटील, मुकुंद पाटील आदी उपस्थित होते.
Comments