नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न..

सुविधा मार्गदर्शन केंद्र, योजना आपल्या दारी उपक्रम संपन्न..  

पनवेल दि.२२ (वार्ताहर) : रायगड जिल्हा नियोजन समिति सदस्या तथा कार्यतत्पर नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र, योजना आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात आला. 
शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सिताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये काही निवडक योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कार्यक्रमही घेण्यात आला.

यावेळी नगरसेवक नितीन पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेविका निता माळी , जेष्ठ कार्यकर्त्या सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, ओबीसी मोर्चा पनवेल शहर सरचिटणीस प्रसाद म्हात्रे, सूर्यकांत पंडित, सपना पाटील, श्वेता म्हात्रे, स्नेहा पंडित, निता मंजुळे, सनी बागडी, कविता पाटील, कल्पिता खेडेकर, चेतन वाघ, विकी कागडा, ऋषिकेश घेरडे, प्रीती आरे, मनीषा वाघ, मेनिया रिडो यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते. 


फोटो : नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिसचे औचित्य साधून सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र, योजना आपल्या दारी उपक्रम
Comments