भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा..
भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा

पनवेल  : -  भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद केला.  त्या अनुषंगाने आज पनवेलमध्ये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑनलाईन पद्धतीने संवाद कार्यक्रम पार पडला. 
यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सुनिल घरत, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, संतोष शेट्टी, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, संजय जैन, अमरीश मोकल, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष के. सी. पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान पनवेल तालुका व शहर भाजपच्या कार्यालयात सुरेख रांगोळी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली.  
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image