शिवसेनेमुळे विद्यार्थी व नागरिकांना भारनियमना पासून मिळाला दिलासा, भारनियमन केले रद्द..

महानगर संघटक प्रथमेश सोमण यांचा पुढाकार

पनवेल / प्रतिनिधी : -  आज मंगळवार दि . १५ रोजी सकाळी अमरधाम स्मशानभूमी ते ओल्ड पोस्ट ऑफिस या पूर्ण इलाख्यात शट डाऊन /भारनियमन करण्यासंबंधीचे मेसेज नागरिकांना काल रात्री उशिरा प्राप्त झाले होते. आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून पहिला पेपर आहे व परीक्षेचे सेंटर देखील या पट्ट्यात मोडते, तथापि विद्यार्थ्यांचा सुरू असलेला अभ्यास, प्रचंड उकाडा या सर्वांमुळे आजच्या दिवशी हे भारनियमन होऊ नये अशी तक्रार मा नगरसेवक, पनवेल महानगर संघटक सोमण यांच्याकडे आली, काही नागरिकांनी व्हाट्सअप वर द्वारे केली होती. 
सदर बाबतीत सकाळी ताबडतोब त्यांनी महावितरणकडे याबाबत चर्चा केली असता महानगरपालिकेच्या एका कामामुळे लाईन बंद करणार आहोत असे सांगितले. त्यावेळी महानगरपालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी व महावितरणचे अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क आणि पाठपुरावा घेऊन आज सकाळी नऊ वाजल्यापासून होणारे भारनियमन रद्द करण्यास भाग पाडले आहे. चुकीच्या वेळी अशा पद्धतीने काम सुरू करून विद्यार्थी व नागरिकांना त्रास झाल्यास प्रत्यक्ष जागेवर येऊनच काम बंद करू असा इशारा दिला. अखेरीस महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आजचे भारनियमन करणार नसल्याबाबत खात्री दिली. 

Comments