कामोठे वसाहतीत गुटख्याचा साठा जप्त...
कामोठे वसाहतीत गुटख्याचा साठा जप्त

पनवेल दि.13(वार्ताहर) :  कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौपाडा गावामध्ये एका बंद खोलीमध्ये साठवणूक करून ठेवलेल्या गुटख्याच्या दोन गोणी असलेला सुमारे दीड ते दोन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने जप्त केला आहे. यातील चार आरोपींपैकी दोन आरोपीना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. याबाबतचा गुन्हा कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघन माळी यांनी दिली.

गुटखा, पान मसालयाचे व्यसन लागत असल्यामुळे खाणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्रीस महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र प्रतिबंध असलेल्या या पदार्थांची सरास विक्री व तस्करीचे प्रकार सध्या सुरु असल्याचे दिसत आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी गुटखा विक्रीबाबत कारवाईची मोहीम घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन काम सुरू असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना गोपनिय बातमीदारामार्फत कामोठे वसाहतीतील नौपाडा गावामध्ये एका बंद खोलीमध्ये मोठया प्रमाणात गुटख्याचा साठा करण्यात आला असून त्याची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, त्याचबरोबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त, सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठेतील नौपाडा गावातील त्या बंद खोलीच्या भागामध्ये कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन सापळा रचण्यात आला होता. व छापा टाकला. यावेळी दोन गोणी भरून असलेला सुमारे दीड ते दोन लाच रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला. यावेळी चार आरोपीपैकी दोन आरोपीना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहे. यांचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कक्ष 3, गुन्हे शाखेचे वपोनिरी शत्रुघ्न माळी, सपोनि ईशान खरोटे, पोहवा मोरे , पोहवा कोळी, पोहवा वाघमोडे, पोना पाटील, पोना जेजूरकर, पोना पाटील, पोना फुलकर, पोना जोशी, पोना मोरे, पोना सोनवलकर, यांनी सहभाग घेवुन महत्वपुर्ण कामगीरी बजावलेली आहे.


Comments