विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या तत्परतेने भुयारी मार्गावरील साचलेल्या पाण्याचा प्रश्‍न निकाली..
विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या तत्परतेने भुयारी मार्गावरील साचलेल्या पाण्याचा प्रश्‍न निकाली
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या तत्परतेमुळे पनवेल रेल्वे स्थानकामधील भुयारी मार्गावर साचणार्‍या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.
पनवेल रेल्वे स्थानका मधील भुयारी मार्गातील पायर्‍यांजवळ पाणी साचले होते, गेले दोन दिवस थोड्या प्रमाणात पाणी होते परंतु आज पाण्याचे प्रमाण वाढले होते आणि त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणाहून पायी चालणे  त्रासाचे झाले होते. याबाबत तेथील प्रवाशांनी याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना दिली. सदर तक्रारी बाबत त्वरित कार्यवाही  करून तेथील अधिकारी राजेश पाटील यांच्या कडून माहिती घेतली असता  सदर बेसमेंटमध्ये पाणी उपसा करणारी मोटर नादुरुस्त झाली होती. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी साचले होते हे त्यांनी मान्य केले. येत्या 12 तासात आम्ही सदर मोटर दुरुस्त करून चालू करू असे त्यांनी प्रीतम म्हात्रे सांगितले. त्याप्रमाणे सदर मोटर दुरुस्त करून पाणी उपसा सुरू झाला व त्या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. याबद्दल विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे प्रवासी वर्गाने आभार मानले आहेत.

फोटो ः साचलेले पाणी व नंतर निचरा झालेले पाणी
Comments
Popular posts
महापौरपदासाठी नितीन पाटील तर उपमहापौरसाठी प्रमिला पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल...
Image
नवीन पनवेल येथील आगीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत – नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांची पाहणी...
Image
पनवेल पिल्लई युनिव्हरसिटी मध्ये 'अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई' चित्रपटाची टीम विद्यार्थ्यांच्या भेटीला ...
Image
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल, श्रीवर्धन, माणगाव, महाड, तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार...
Image
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचा माणगाव, महाड आणि श्रीवर्धन मधील शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर ...
Image