हातातील मोबाईल खेचून स्कुटीवरुन दोघेजण पसार..
हातातील मोबाईल खेचून स्कुटीवरुन दोघेजण पसार

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः आपल्या घरी जाण्याकरिता बसच्या प्रतिक्षेत असलेल्या एका इसमाच्या हातातील मोबाईल खेचून दोघेजण स्कुटीवरुन पसार झाल्याची घटना शेडुंग फाटा परिसरात घडली आहे.
सचिन गाणे (30) हे शेडुंग फाटा येथे घरी जाण्यासाठी बसची वाट बघत उभे असताना स्कुटीवरुन दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ येवून त्यापैकी पाठीमागे बसलेल्या एका इसमाने त्यांच्या हातातील 15 हजार रुपये किंमतीचा रेड मी कंपनीचा मोबाईल फोन खेचून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image