NMGKS संघटनेची नवीन वर्षाची धमाक्यात सुरुवात ; ग्लोबीकॉन कामगारांनी स्विकारले महेंद्र घरत यांचे नेतृत्व..
NMGKS संघटनेची नवीन वर्षाची धमाक्यात सुरुवात ; ग्लोबीकॉन कामगारांनी स्विकारले महेंद्र घरत यांचे नेतृत्व
       
     
पनवेल / वार्ताहर : -  NMGKS संघटनेची वाटचाल अखंडितपणे सुरु आहे. २०२२ नविन वर्षाच्या सुरुवातीसच कोप्रोली – उरण येथील ग्लोबीकॉन (ICTPL) लॉजिस्टीक पार्क या कंपनीत लोकल लेबर कामगारांनी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष, कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण दिनांक ८ जानेवारी रोजी करण्यात आले.
            यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रामन , सरचिटणीस श्री. वैभव पाटील, उपाध्यक्ष  विनोद म्हात्रे, संघटक प्रेमनाथ ठाकूर, जेष्ठ नेते केशव घरत, कोप्रोली गाव अध्यक्ष विवेकानंद म्हात्रे,  माजी. सदस्य योगानंद म्हात्रे, परमानंद पाटील, खोपटेचे उपसरपंच सुजित म्हात्रे, निरज पाटील, संघटक विजय पाटील, अरुण म्हात्रे, आनंद ठाकूर, अरुण पाटील, राजेंद्र भगत, प्रशांत पाटील, भरत पाटील व ग्लोबिकॉंनचे कामगार उपस्थित होते.
Comments