कंटनेर ट्रेलरची धडक ; मोटारसायकल चालकाचा मृत्यू....
कंटनेर ट्रेलरची धडक ; मोटारसायकल चालकाचा मृत्यू....

पनवेल, दि . ४  (संजय कदम) ः कळंबोली येथून मोटारसायकलवरुन करंजाडे येथे जाणार्‍या व्यक्तीला भरधाव कंटनेरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना कळंबोली-जेएनपीटी मार्गावर घडली. या अपघातानंतर कंटनेर चालकाने कंटेनर त्याच ठिकाणी सोडून पलायन केले असून कामोठे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
सदर अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आदम मकानदार (46) असे असून ते पनवेल मधील करंजाडे सेक्टर-2 मध्ये वुटुंबासह राहण्यास होते. मकानदार कामानिमित्त आपल्या मोटारसायकलवरुन कळंबोली येथे गेले होते. त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते कळंबोली येथून करंजाडे येथे परतत होते. यावेळी त्यांची मोटारसायकल कळंबोलीजेएनपीटी मार्गावर खांदागाव स्मशानभूमीजवळ आली असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात आदम मकानदार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडल्यानंतर त्यांना धडक देणार्‍या कंटेनर चालकाने आपल्या ताब्यातील कंटेनर त्याच ठिकाणी सोडून पलायन केले. यावेळी इतर प्रवाशांनी जखमी आदम मकानदार यांना रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेनंतर कामोठे पोलिसांनी कंटनेर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Popular posts
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image