ग्राहकाला धारदार चाकूने जखमी करणार्‍या वेटरला केले गजाआड....
ग्राहकाला धारदार चाकूने जखमी करणार्‍या वेटरला केले गजाआड....

पनवेल, दि.2 (संजय कदम) ः गिर्‍हाईकांना नीट सर्व्हीस दे असे सांगितल्याने त्याचा राग मनात धरुन सदर तक्रारदाराला वेटरने धारदार चाकूने वार करून जखमी केल्याची घटना पनवेल परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली असून याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सदर वेटरला गोपनीय बातमीदाराद्वारे ताब्यात घेतले आहे.
करणकुमार मेहता याने सदर हॉटेलमध्ये काम करणारा वेटर परविंदर अरोरा (35) याला गिर्‍हाईकांना नीट सर्व्हीस दे असे सांगितल्याने त्याचा राग मनात धरुन त्याच्या जवळ असलेल्या धारदार चाकूने त्याने करणकुमार याच्या कानावर, डाव्या कानाच्या मानेवर व डाव्या बाजूस कमरेवर व ओठावर वार करून त्याला गंभीर जखमी करून तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि विजय कादबाने, गुन्हे शाखा पो.नि.संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी, पोलीस हवालदार गंथाडे, पो.ना.राठोड, पो.शि.मिसाळ, पो.ना.साळुंके आदींच्या पथकाने सदर आरोपीला गुप्त बातमीदाराच्या आधारे मुंबई परिसरातून ताब्यात घेतले आहे.
Comments