कर्नाळा सर्कल पासून २० मीटरच्या अंतरावर कोणतेही वाहन पार्किंग करण्यास मनाई...
कर्नाळा सर्कल पासून २० मीटरच्या अंतरावर कोणतेही वाहन पार्किंग करण्यास मनाई... 

वाहतूक नियंत्रण अधिसूचना अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही...

पनवेल / वार्ताहर : - वाहतूक नियंत्रण अधिसुचना, पनवेल वाहतुक शाखेच्या हद्दीतील , कर्नाळा सर्कल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक , टपाल नाका , गुरु नानक चौक , आयडीबीआय बँक , भाजपा पार्टी ऑफिस , रुपाली सिनेमा टॉकिज अशा विविध बाजूंनी येणारे रोड एकत्र येतात. सदर ठिकाणी भाजी मार्केट , बँका तसेच बाजारपेठ आहे . 
तसेच या ठिकाणी खरेदी करता येणारे नागरिक आपले वाहने इतरत्र कोठेही पार्क करतात. परिणामी तेथे वाहतुक कोंडी होते. कर्नाळा सर्कल हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने व या परिसरात यात नमुद केलेल्या विविध आस्थापना असलेने हा परिसर  नेहमी गर्दीने गजबजलेला असतो.
कर्नाळा सर्कल हा परिसर हा अतिशय दाटीवाटीचा परिसर असल्याने व येथील परिसरात नागरिकांची नेहमीच जास्त वर्दळ असल्याने त्या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते . त्यामुळे आपत्कालीन परिस्थीती निर्माण झाल्यास या ठिकाणी मदत पाठविणेसाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे , महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र . एम . व्ही . ए . ११६ / सीआर / ३७ / टीआर , दिनांक २७ . ० ९ .१ ९९ ६ चे अधिसूचनेनूसार मोटार वाहन कायदा कलम ११५ ११६ ( १ ) ( अ ) ( ब ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पुरुषोत्तम कराड , पोलीस उप आयुक्त, वाहतुक , नवी मुंबई यांनी पुढीलप्रमाणे आदेश केले आहेत. 
कर्नाळा परिसरातील वाहतुक सुरळीत होण्याचे दृष्टीने कर्नाळा सर्कल कडे येणा- या 
१ ) कर्मवीर भाऊराव पाटील चौक 
२ ) छत्रपती शिवाजी महराज चौक 
३ ) रुपाली सिनेमा या तिन्ही बाजूंच्या रस्त्यावर कर्नाळा सर्कल पासुन २० मीटर अंतरापर्यंत कोणतेही वाहन “ रस्त्यावर पार्क करण्यास मनाई करण्याची अधिसूचना घोषित करण्यात आली आहे. 
सदरची अधिसूचना दिनांक ०३/१२/२०२१ रोजी पासून पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहील.  वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने , फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही. 

Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल शहर शाखेत मानवंदना..
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image