नगरसेवक ऍड.नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश...
नगरसेवक ऍड.नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश...
पनवेल / वार्ताहर : - खारघर मधील नवीन मतदारांचे तयार झालेले स्मार्ट कार्ड तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहेत हे समजताच मा. नगरसेवक ऍड. नरेश ठाकूर यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले होते की, मतदारांना प्रत्येक वेळी तहसील कार्यालयात येणे शक्य होणार नाही, त्याचे वितरण त्या त्या प्रभागात करावे. 
याबाबत सदरचे निवेदन देताना नगरसेवक नरेश ठाकूर, अभिमन्यूशेठ पाटील, नीलेश बाविस्कर, सरचिटणीस किर्ती नवघरे, समीर कदम, वासुदेव पाटील उपस्थित होते.
या विनंती अर्जाचा विचार करून उद्या ३०/१२/२०२१ पासून खालील ठिकाणाहून मतदार ओळ्खपत्राचे वितरण होणार आहे.
Comments