खारघर वसाहतीमधील आठवडा बाजार व फेरीवाल्यांवर पनवेल महानगरपालिकेने कारवाई करावी अन्यथा युवा सेना महानगरपालिके समोर आठवडा बाजार भरविणार...
खारघर वसाहतीमधील आठवडा बाजार व फेरीवाल्यांवर पनवेल महानगरपालिकेने कारवाई करावी अन्यथा युवा सेना महानगरपालिकेसमोर आठवडा बाजार भरविणार
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः खारघर वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे व राजकीय पुढार्‍यांच्या आशिर्वादाने आठवडा बाजार व फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून याच्या विरोधात पनवेल महानगरपालिकेने धडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत असूनही याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याच्या विरोधात आता युवा सेना रस्त्यावर उतरुन पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरच आठवडा बाजार भरविणार आहे. 
याबाबतचे निवेदन युवा सेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांनी पनवेल महानगरपालिकेला दिले असून यावेळी त्यांच्या सोबत युवासेना उपतालुका अधिकारी अनिकेत पाटील, खारघर शहर अधिकारी विनोद पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत यांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इतर शहरांसह खारघर वसाहतीमध्ये सेक्टर 2 पासून ते सेक्टर 21 पर्यंत खाद्यपदार्थ विक्रेते व कपडे विकणार्‍या फेरीवाल्यांनी सर्वच रस्ते व्यापून टाकले आहेत. हिरानंदानी, लिटील वर्ल्ड, बँक ऑफ इंडिया चौक, शिल्प चौक, नवरंग चौक, डेली बाजार या ठिकाणी फेरीवाले सकाळी व संध्याकाळी आपली दुकाने मांडून फुटपाथ व रस्त्यावर बसलेले असतात. याबरोबरच अनेक ठिकाणी आठवडे बाजार देखील सर्रासपणे चालू आहेत. याबाबत अनेकांनी पनवेल महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. महानगरपालिकेच्या सुरूवातीच्या काळात असलेले आयुक्त सुधाकर शिंदे यांनी खारघर रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविले होती व त्यांना यश सुद्धा मिळाले होते. परंतु सध्याचा अधिकारी वर्ग अशा प्रकारची मोहिम राबविण्यास का कचरत आहेत? असा सवाल करण्यात येत असून आयुक्तांनी याबाबत लक्ष घालून खारघर वसाहत फेरीवाला मुक्त करावी अन्यथा येथील कार्यालया समोरच फेरीवाल्यांची दुकाने लावून युवा सेना आंदोलन छेडेल असा इशारा सुद्धा दिला आहे.


फोटो ः आयुक्तांना निवेदन देताना युवा सेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, त युवासेना उपतालुका अधिकारी अनिकेत पाटील, खारघर शहर अधिकारी विनोद पाटील
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image