युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत नितळस येथील शेकाप कार्यकर्त्यांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश..
युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत नितळस येथील शेकाप कार्यकर्त्यांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश..

पनवेल / प्रतिनिधी : - बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननिय उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन व राज्यशिष्टाचार मंत्री  आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते नितळस येथील शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच सुनील काठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, रविंद्र काठे व शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

या प्रसंगी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, रामदास गोंधळी, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, परशुराम भोपी, एकनाथ काठे, शिवसैनिक सिद्देश गुरव आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image