कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकांची परंपरा खंडित होणार नाही - लोकनेते रामशेठ ठाकूर
कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकांची परंपरा खंडित होणार नाही - लोकनेते रामशेठ ठाकूर 
पनवेल(प्रतिनिधी) कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकांची परंपरा खंडित झालेली नाही आणि होणार नाही, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी (दि. ०३) दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशनावेळी केले. 
  ज्येष्ठ पत्रकार संजय कदम संपादित १८ व्या 'श्री. स्वामी समर्थ', ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संपादित 'पनवेल टाइम्स', पत्रकार निलेश सोनावणे संपादित 'पनवेल युवा', पत्रकार केवल महाडिक संपादित 'कोकण संध्या, पत्रकार अनिल भोळे संपादित 'रसायनी टाइम्स' या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी मठाधिपती सुधीरभाऊ घरत, प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, दीपक महाडिक, रमेश भोळे, सय्यद अकबर, प्रशांत शेडगे, सुमंत नलावडे, दीपक घोसाळकर, अनिल कुरघोडे, गणपत वारगडा, राज भंडारी, विशाल सावंत, प्रविण मोहोकर, असीम शेख, दिनेश गिल्डा, रवींद्र गायकवाड, सनीप कलोते, सुमेधा लिम्हण, कवियत्री ज्योत्स्ना राजपूत  सुनिता रामचंद्र, आदी उपस्थित होते. 
       वाचकांची अभिरूची समृद्ध करण्याचे काम दिवाळी अंकांनी सातत्याने केले. त्यामुळे वाचक संस्कृती वृद्धिगत होण्याबरोबरच परंपरा टिकवण्याचे काम या माध्यमातून आहे. असेही त्यांनी नमूद केले. दिवाळीतील मेजवानी आणि खास मराठी संस्कृतीची ओळख असलेले दिवाळी अंक करोनाची छाया व आर्थिक प्रश्न यातून वाट काढत प्रसिद्ध झाले, ही बाब मराठी मनाला अभिमान वाटावा अशी आहे. त्यामुळे दिवाळी अंकासाठी मेहनत घेणारी संपादन टीम अभिनंदनास पात्र आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित करत सर्वांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
Comments
Popular posts
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image