भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भा.ज.यु.मो प्रदेशाध्यक्ष, उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे आज उद्घाटन.....
पनवेल वैभव : - भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.उपमहापौर पनवेल विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे रविवार दि-१४ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून मा.मंत्री आ.रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ.कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर,सभापती,नगरसेवक आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमा निमित्त संवाद कार्यक्रम विरुपाक्ष हॉल, अशोक बाग,विर सावरकर चौक रोड,पनवेल येथे होणार आहे.
तरी या कार्यक्रमास पनवेलकर नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन युवा मोर्चातर्फे करण्यात आले आहे.