अज्ञात वाहनाच्या धडकेने स्कुटी चालकाचा मृत्यू....
अज्ञात वाहनाच्या धडकेने स्कुटी चालकाचा मृत्यू....

पनवेल, दि.१  (संजय कदम) : -  अज्ञात वाहनाच्या धडकेने एका स्कुटी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील चिरनेर-गव्हाण रोडवर स्कोप वेअर हाऊस साई सहारा हॉटेलच्या बाजूला गव्हाण फाटा येथे घडली आहे.
स्कुटी चालक पुरुषोत्तम कुशवाहा (37) हे त्यांच्या स्कुटीवर घरी येत असताना कुणीतरी अज्ञात वाहनाच्या चालकाने सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आपले वाहन बेदरकारपणे व अतिवेगाने चालवून त्यांच्या गाडीस ठोकर मारुन झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी होवून मृत्यू पावले आहेत. सदर घटनेनंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments