पारगाव परिसरातील विकास कामांना पंचायत समिती मार्फत सुरूवात...
पारगाव परिसरातील विकास कामांना पंचायत समिती मार्फत सुरूवात....
पनवेल, दि. १४ (वार्ताहर) ः पारगाव परिसरातील विकासकामांना पंचायत समितीच्या माध्यमातून सुरूवात झाली असून त्याअंतर्गत पाण्याच्या पाईप लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
15 व्या वित्त आयोग बाधित निधीमधील कामे 20/21 ग्रुप ग्रामपंचायत पारगाव अंतर्गत कमानीपासून ते बाळू चहाच्या दुकानापर्यंत पाण्याच्या पाईप लाईन टाकण्याच्या विकास कामांचा शुभारंभ पनवेल पंचायत समितीच्या सदस्या रेखा दिनेश म्हात्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, उपसरपंच अंजली कांबळे, मा.उपसरपंच मनोज दळवी, तंटामुक्तीचे अध्यक्ष सदाशिव पाटील, ग्रामविकास अधिकारी मोरेश्‍वर मोकल, ज्ञानेश्‍वर म्हात्रे, सुनील पाटील, सुहास पाटील, सचिव पाटील, जगदीश म्हात्रे, देवळे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.


फोटो ः पारगाव परिसरातील विकास कामांचा शुभारंभ करताना.
Comments