विचुंबे गावात शिवसेना शाखा उदघाटन सोहळ्यात शेकडो पुरुष, महिला व युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश...
विचुंबे गावात शिवसेना शाखा उदघाटन सोहळ्यात शेकडो पुरुष, महिला व युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश...

पनवेल वैभव वृत्तसेवा : -  सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पनवेल तालुक्यातील विचुंबे गावात नवीन शिवसेना शाखा उदघाटन सोहळा व पनवेल ग्रामीण येथील उसर्ली, पाली- देवद व विचुंबे येथील शेकडो पुरुषांचा व महिलांचा तसेच युवकांचा पक्षप्रवेश मावळ लोकसभा खासदर श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख  शिरीष घरत व जिल्हासंघटिका रेखाताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. 

सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर संघटिका नवीन पनवेल मंदा जंगले, उपमहानगर प्रमुख यतीन देशमुख, शाखा प्रमुख विशाल भोईर, विभाग संघटिका स्मिता भोईर, उपविभाग संघटीका  शारदा पाटील, शाखा संघटिका ज्योती पाटील यांच्यावतीने करण्यात आले. 

सदर कार्यक्रमास रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, उपजिल्हा संघटक परेश पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे,  तालुका संघटक भरत पाटील,  विधानसभा संघटक दिपक निकम, पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, शहर प्रमुख कामोठे राकेश गोवारी, खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, कलंबोली शहर प्रमुख डी.एन. मिश्रा, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. कल्पना पाटील, विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, तालुका संघटिका मेघा दमडे, तालुका संघटिका अनीता डांगरकर, युवासेनेचे जिल्हा अधिकारी मयूर जोशी, उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, तालुका अधिकारी केवल माळी, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी तसेच महिला आघाडी व शिवसैनिक तसेच विचुंबे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments