शिवसैनिकांनी करून घेतली कळंबोली ग्रामीण भागात साथीच्या रोगांवरील औषध फवारणी....

शिवसैनिकांनी करून घेतली कळंबोली ग्रामीण भागात साथीच्या रोगांवरील औषध फवारणी....

पनवेल वैभव वृत्तसेवा  : -  जिल्हाप्रमुख शिरीष घरत , महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व कळंबोली शहर प्रमुख डी.एन.मिश्रा यांच्या सहकार्याने साथीच्या रोगांवरील औषध फवारणी कळंबोली ग्रामीण भागात करण्यात आली.

कळंबोली, प्रभाग क्र. ९ येथील ग्रामीण भाग टेंम्बोडे, वळवली, सागवाडी, वाघाचीवाडी या गावांमध्ये मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांवरील ‌‌‌‌औषध फवारणी करून घेतली या प्रसंगी शहर समन्वयक गिरीश धुमाळ, उपशहर प्रमुख  सुर्यकांत म्हसकर, उपतालुका संघटक सौ टिया अरोरा धुमाळ, विभाग प्रमुख आकाश शेलार, उपविभाग प्रमुख दीपक कोडवते, मेघनाथ भोईर, अंकुर पाटील,उपशाखा प्रमुख विकास पेटकर, विभाग संघटक नरेश उलवेकर, सुमित सूर्यवंशी व प्रशांत वाडकर, बबन वाघ ज्येष्ठ शिवसैनिक टेंभो़डे, आदी शिवसैनिक उपस्थित होते. तसेच मागणी नुसार कामाला सुरुवात केल्याबद्दल कळंबोली  शिवसेने तर्फे पनवेल महानगर पालिकेचे प्रभाग अधिकारी  अमित जाधव व त्यांचे कर्मचारी यांचे आभार सैनिकांनी मानले.
Comments